सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
अनेक वर्षानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय मिळालेच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेच्यावतीने तहसील कार्यालय तसेच नगरपरिषद भोरच्या समोर ढोल ताशा वाजवीत फटाके फोडून लाडू, पेढे वाटून जल्लोष केला.
गेल्या पंचवीस वर्षाच्या मागणीला भरघोस यश येत महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला.प्रहार अपंग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ३ डिसेंबर २०२२ ला जागतिक अपंग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात येणार आल्याचे जाहीर केले आहे.या निमित्ताने भोर तहसील कार्यालय व भोर नगरपालिकेसमोर ढोल ताशाच्या गजरात व फटाके फोडून लाडू व पेढे वाटून प्रहार अपंग क्रांती संघटना भोरच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला व जोरदार घोषणा देत सरकारचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी तालुका प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले, भानुदास दुधाने ,दत्ता हिंगे ,राजकुमार मोरे ,पांडुरंग दिघे ,महिला अध्यक्ष मनीषा गायकवाड, सत्वशीला सणस ,महेंद्र सोनवणे, महिला उपाध्यक्ष संगीता शिवतारे ,गणपत धोंडे, प्रदीप शिनगारे ,बाबू कंक ,अमोल नांगरे, विठ्ठल बुदगुडे, मोहन शेटे तसेच भोर शहराध्यक्ष सतीश शिर्के, उपाध्यक्ष सुनील पळशीकर ,सचिव अशोक मोरे, प्रिया शेख, महिला अध्यक्ष संगीता बहिरट, महिला उपाध्यक्ष शाईन शेख, बबन शिंदे ,बाळासाहेब उन्हाळकर, रोहिदास बोडके अनिल गिरे, रमेश गुरव, तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती संघटनेचे दिव्यांग बांधव उपस्थित होते.