सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
भुईंज ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाची एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली असल्याची माहिती, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
खंडाळा कारखान्याची एफआरपीची राहिलेली रक्कम या अगोदरच वर्ग करण्यात आलेली होती. सन २०२१-२२ मध्ये किसन वीरकडे गळीताकरिता आलेल्या संपुर्ण ऊसाची एफआरपीची रक्कम येत्या दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेत जमा करणार असल्याची ग्वाही कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी दिलेली होती. ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांना दिलेल्या शब्दानुसार सन २०२१-२२ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसाची होणारी सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. एफआरपीची रक्कम वर्ग झाल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आमदार मकरंद पाटील व व्यवस्थापनावर विश्वासार्हता निर्माण झालेली दिसून येत आहे. तरी ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी आपला परिपक्तव झालेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे व संचालक मंडळाने प्रसिद्धीपत्राद्वारे केले.
------------