भोर ! वरवडीच्या पै.स्वप्नील वरेची अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वरवडी ता.भोर येथील पै.स्वप्नील वरे याची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेसाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ६१ किलो वजनी गटामध्ये निवड झाली असल्याने वरे याच्यावर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. पैलवान स्वप्नील वरे हे गरीब कुटुंबातील असून त्यांना जवाहर कुस्ती संकुल भोरचे वस्ताद सुनील शेटे,तालुका तालीम संघाचे अध्यक्ष मोहननाना खोपडे व एनआयएस कुस्ती कोच संदीप जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
         ग्रामीण भागातूनच कसरतीच्या जोरावर पैलवान घडतात ग्रामीण भागातील विद्यार्थी हे चिवट व कष्टाळू असल्याने कुस्ती क्षेत्रात नियमित कसरतीच्या माध्यमातून घडत असतात.जवाहर कुस्ती संकुलातील पहिलाच विद्यार्थी पैलवान स्वप्नील वरे याची निवड कुस्तीसाठी राष्ट्रीय पातळीवर झालेली आहे.पुढील काळात असेच अनेक विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जवाहर कुस्ती संकुल भोरचे संस्थापक व वस्ताद सुनील शेटे यांनी सांगितले.
To Top