सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे किरण कुरुंदकर यांनी याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत साठी गेल्या अनेक दिवसांपासून गुडग्याला बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने गावागावात इच्छुकांनी गर्दी केली आहे. निवडणूक लागणार असल्याने दिवाळीपूर्वीच अनेक इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुरू करत मातदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली आहे. दि १८ रोजी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये राज्यभरातील ७ हजार ७७१ तर पुणे जिल्ह्यातील जवळपास २२१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम--👇
दि १८ नोव्हेंबर रोजी नोटीस प्रसिद्ध
दि २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अर्ज स्वीकारणारे व भरणे
दि ५ डिसेंबर अर्जाची छाननी
दि ७ डिसेंबर अर्ज मागे घेणे, उमेदवार याद्या प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप
दि १८ डिसेंबर रोजी मतदान
दि २० डिसेंबर मतमोजणी व निकाल
-----------------------