सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.त्यातील २४ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर ३० ग्रामपंचायतची निवडणूक रविवार दि.१८ पार पडणार आहे.यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून ८०० कर्मचाऱ्यांचा फौज फाटा निवडणुकीसाठी तैनात असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
तालुक्यात ३० ग्रामपंचायतींमध्ये २९ सरपंचपदासाठी ७५ तर ११४ सदस्यपदासाठी २३२ उमेदवार रिंगणात आहेत.८९ केंद्रांवर हे मतदान पार पडणार असून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व सीलबंद मतपेट्या भोर आयटीआय येथील कार्यालयाच्या हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत.तर याच ठिकाणी मंगळवार दि.२० सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे.उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे, कोणत्याही प्रकारचे मतदारांना प्रलोभन दाखवू नये, मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे असेही आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.
COMMENTS