सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार भोर तालुक्यातील निगडे येथील विजेचा शॉक लागून दुर्घटना घडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून विचारपूस करीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी सांत्वन केले. यावेळी विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे आणि आनंदा ज्ञानेश्वर जाधव या ४ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून प्रत्येकी २ लाख आणि महावितरण विभागाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी संबंधित यंत्रणांना सूचित करण्याचे सांगण्यात आले.यावेळी उपसरपंच किशोर बारणे व ग्रामस्थ उपस्थित होते.