सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या ३० ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू असून मतदार सकाळपासूनच शिस्तीचे पालन करून रांगा लावून मतदान करीत आहेत.
तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींचे निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील २४ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित ३० ग्रामपंचायतींची रविवार दि.१८ निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.मतदान केंद्रांवर मतदार गर्दी करीत असले तरी पोलीस बंदोबस्त चोख असल्याने रांगेत उभे राहूनच शिस्तबद्धपणे मतदानाची प्रक्रिया होत आहे.सद्या ४२ टक्के मतदान झाले आहे.