सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे)
आज अनेक ठिकाणी वाढदिवस साजरे होतात, मात्र वाढदिवसानिमित्त उसाच्या फडात फक्त दोन महिन्याच्या चिमुकलीचा नामकरण सोहळा करून तीला दत्तक घेऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या साजरा करणाऱ्या येथील संस्कृती महिला मंडळाच्या अध्यक्ष शीतल निलेश फाळके यांनी समाजाला एक आगळा वेगळा आदर्श देऊ केला आहे.
सातारारोड पाडळी ता कोरेगाव येथील आदित्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी प्रमुख असणाऱ्या शीतल फाळके यांचे शेतात ऊसतोड चालू होती त्यावेळी त्यांचे पती नीलेश फाळके यांनी एका महिलेला दोन महिन्याच्या मुलींसमवेत काम करताना पहिले व विचारले हिचे बारसे केले आहे का तेव्हा कष्ट करणाऱ्या या महिलेने सांगितले आज इथे उद्या तिथे कसले बारसे अन कसले नाव प्रसूती झाल्यावर आठ दिवसात आम्ही कामावर हजर झालो, हे उत्तर ऐकले तेव्हा त्याच दिवशी त्यांच्या पत्नी शितल याचा वाढदिवसाच्या होता, हा वाढदिवसाच्या आपण उसाच्या फडात साजरा करू असे त्यांनी सुचविले ही कल्पना ऐकून संस्कृती महिला मंडळाच्या माध्यमातून नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या फाळके यांनी महिलांना बरोबर घेत थेट उसाचा फड गाठला,
बीडची असणारी मुलीची आई सौ रंजना व वडील लखन पडोळकर व कामगार महिला यांच्या बरोबरीने उसाच्या फडात मोठ्या थाटात या मुलीचा नामकरण सोहळा सर्व सोपस्कार पार पाडून ओटी भरून,पाळना म्हणून मुलीच्या आईला भेटवस्तू देऊन साजरा झाला , मुलीचे नावं संस्कृती ठेवून तीला फाळके यांनी दत्तक घेत तिच्या सम्पूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली, जरंडेश्वर केटरर्सचे संदीप फाळके यांनी सर्वांना मोफत जेवण दिले तर किसन घाडगे यांनी सर्वांना जिलेबी दिली यावेळी अंगणवाडी सेविका स्वाती घाडगे, अनिता सुतार, वंदना ताटे,रुपाली सुतार यांनी धाराऊ मिशनच्या माध्यमातून पाळना म्हणत स्तनपानांचे महत्व सांगितले,
मंडळाच्या गौरी गाढवे, योगिता फाळके, भारती फाळके, रजनी घाडगे,अनुजा मिठारे,ग्रामपंचायत सदस्य संगीता रावन व वंदना फाळके,सुमन वाघमारे, उर्मिला ताटे,रुपाली फाळके,शितल जाधव, मनीषा फाळके,या उपस्थित होत्या,टोळी मुकादम विनायक जाधव यांनी फडात हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल महिलांचे आभार मानले,
------------------------
खरोखरचं खूप छान पद्धतीने हा सोहळा रंगला होता त्या मुलीच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहुन आम्हाला अश्रु अनावर झाले होते शितल फाळके यांच्या वाढदिनी या अनोख्या नामकरण सोहळ्यात आम्हाला सहभागी होता आले हे आमचे भाग्यच आहे.
योगिता फाळके सातारा रोड पाडळी