सोमेश्वर रिपोर्टर टीम------
संतोष म्हस्के
भोर आणि खंडाळा तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या कान्हवडी ता.भोर येथील शेतकरी जनार्दन कृष्णा मर्गजे यांच्या गाईचा लंपी आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. भोर तालुक्याच्या वेशीवरच लंपीमुळे गायीचा मृत्यू झाल्याने परिसरातील खानापूर,फडतरेवाडी ,उत्रोली, पोळवाडी येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
मागील दोन वर्ष शेतकरी कोरोनामुळे अडचणीत आला होता.यातून कसेबसे बाहेर पडत असतानाच पुन्हा एकदा लम्पी आजाराचा फैलाव झाल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.लम्पिने मृत झालेले गाईचा पंचनामा केलेला असून यावेळी पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .सद्या कान्हवडी ता.खंडाळा या गावात अजूनही २ जनावरे लंपीने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे पशुधन विकास अधिकारी लोहोम ता.खंडाळा डॉ.अक्षय मोटे यांनी सांगितले.
----------------
भोर तालुक्यात लंपी नियंत्रणात
भोर तालुक्यात बहुतांशी प्रमाणात लंबी हा आजार नियंत्रणात आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झालेले असून सध्या उर्वरित लहान वासरे आणि गाभन पहिल्या टप्प्यात राहिलेल्या गाईंना लसीकरण सुरू आहे.शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.तसेच लाळ खुरकूत रोगाची लस तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना उपलब्ध झालेले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत सोनटक्के केले आहे.