निवडून आलेला सरपंचच म्हणतो....! कशाला आभाराचे फ्लेक्स... तालुक्याला समजलंय की..निवडून आलोय ते....! गावाचा विकास महत्वाचा, मतदारांचे आभार घरोघरी जाऊन मानुया....

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायत च्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये अनेक मातब्बरांना धोबीपछाड देत सत्तेच्या चाव्या तरुणांनाच्या हातात गेल्या आहेत. 
        बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावाने अशाच एका तरुण चेहऱ्याला सरपंचपदाच्या खुर्चीवर बसवले आहे. उच्चशिक्षित तरुण अॅड. हेमंत विलास गायकवाड याने मॅकेनिकलची डिग्रीसह एलएलबी चे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मागील सदस्य मंडळात असताना हेमंत गायकवाड यांनी तळागाळातील लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच जिल्हा परिषदेतील वयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून दिला आहे. 
          वाघळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पंचरंगी लढतीमुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरली. सरपंचपदासाठी वास्तविक सतीश सकुंडे व हेमंत गायकवाड या दोघांतच चुरस होती. यामध्ये मतदारांनी हेमंत गायकवाड यांना १०४५ इतक्या मतांचे विजयी दान दिले तर सतीश सकुंडे यांना ७७९ मतांवर समाधान मानावे लागले. पहिला प्रभाग वगळता अन्य चारही प्रभागात गायकवाड यांचा वरचष्मा राहिला. भाजपचा युवा चेहरा चेतनकुमार सकुंडे यांनी ४६४ इतकी लक्षवेधी मते मिळाली. मात्र अॅड. अनंत सकुंडे यांना ११९ तर ज्योतिराम जाधव यांना ३४ मतांवरच समाधान मानावे लागले. सदस्यपदाच्या लढतीत सतीश सकुंडे यांच्या अंबामाता वचनपूर्ती पॅनेलला तेरापैकी सात जागांवर विजय मिळवत बहुमत आपल्या बाजूने वळविण्यात यश प्राप्त केले. तर अजिंक्य सावंत, अॅड. गायकवाड, अविनाश सावंत, धोंडिराम जाधव, जितेंद्र सकुंडे, बबन अनपट, सूरज जाधव, गजानन सकुंडे आदींच्या नेतृत्वाखालील अंबामाता ग्रामविकास पॅनेलने पाच जागा मिळू शकल्या.
To Top