सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
कर्णावड ता.भोर येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत काळभैरवनाथ जोगेश्वरी पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सोनाली अविनाश राजवडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून त्या सरपंचपदी विराजमान झाल्या.
कर्णावड ग्रामपंचायतने मागील ३५ वर्षांपासून काँग्रेसने आपल्याकडे कायम सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत काळभैरवनाथ जोगेश्वरी पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सोनाली राजीवडे निवडून आल्या तर ९ पैकी ६ सदस्यांच्या जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या असल्याने पंचक्रोशीतून नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन होत आहे.