भोर ! राजीव केळकर मानवाधिकार पुरस्काराने सन्मानीत

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ध्रुव प्रतिष्ठान टिटेघर चे अध्यक्ष राजीव केळकर यांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केळकर यांना पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.                                                  
          जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जागृती यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.उत्कृष्ट काम केलेल्या मान्यवरांना  राज्यस्तरीय "मानवाधिकार पुरस्कार" मानचिन्ह, सन्मानपत्र, व भारताचे संविधान ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये भोर तालुक्यातील राजीव केळकर यांना गेले अनेक वर्षे भोर तालुक्यामध्ये शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य,शेती या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राजीव केळकर यांची पुरस्कार देवून सन्मानित केले गेले.
    मानवी हक्कांबाबत जागृती व्हायला हवी असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. सुधाकरराव जाधव यांनी केले.यावेळी डॉ. सुधाकर जाधवर,सावित्रीबाई फुले विद्यापीठ सदस्य न्यायाधीश मंगल कश्यप ,पुणे जिल्हा विधि प्राधिकरण शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त नामदेव जाधव, लेखक शार्दुल जाधव, कायदेविषयक सल्लागार समिती ऍड.गायत्री सिंग, ज्येष्ठविधी अड. सचिन झालटे -पाटील ,कायदेशीर सल्लागार डॉ. यामिनी अडवे, बालहक्क कार्यकर्त्या प्राध्यापक धनंजय लंबाते  हे उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रा. सचिन दुर्गाडे यांनी केले.

To Top