सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती प्रतिनिधी
आज दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता बारामती भाजप कार्यालयाच्या बाहेर रोड लगत असणाऱ्या बोर्डवर व कार्यालयाच्या बोर्डवर. काळा रंग टाकण्यात आला. रंग टाकताना चा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला पोलिसांनी तात्काळ सदर व्हिडिओ मध्ये रंग टाकताना दिसणारे सचिन नानासो जगताप वय 38 वर्ष व्यवसाय सेंटरिंग राहणार प्रतिभानगर अमराई व कृष्णा सयाजी सोनवणे वय पन्नास वर्षे राहणार प्रतिभा नगर अमराई व्यवसाय सेंटरिंग यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडे चौकशी करता या दोघांनी रंग टाकताना सचिन जगताप यांच्या कॅमेऱ्यामध्ये महादेव मिसाळ यांनी हा व्हिडिओ काढल्याचे सांगितले आहे . हा व्हिडिओ काढून सचिन जगताप याने त्याच्या फेसबुक अकाउंट वरून हा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलने व प्रति आंदोलने याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या बोर्डवर काळा रंग टाकल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्यांनी हा रंग टाकून व्हिडिओ काढून प्रसारित केला. त्यातून सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न झाला. व सध्या माननीय जिल्हाधिकारी यांचा आंदोलने मोर्चे या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 प्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होऊ नये व सुरक्षिततेला धोका होऊ नये म्हणून ज्या कृती करण्यास प्रतिबंध केलेला आहे अशा प्रकारचे कृती केल्याने वरील तिघांच्या विरुद्ध पोलिसांनी भादवि कलम 153 ,505 ,427 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)( 3 )चे उल्लंघन झाले म्हणून 135 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास सुरू आहे.