भोर ! नसरापुरला रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांचे रक्तदान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य
पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर ता. भोर येथे राष्ट्रीय नेते पद्मविभूषण मा.शरदचंद्रजी पवार यांच्या ८२ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शरद सप्ताह २०२२ निमित्त रक्तदान श्रेष्ठ दान तसेच रक्तदान महासंकल्प समजून ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.                                                                     भोर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजन केले होते.शिबिरासाठी हर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून अक्षय ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बँक संचालक भालचंद्र जगताप,विक्रम खुटवड,चंद्रकांत बाठे, मानसिंग धुमाळ,वंदनाताई धुमाळ, मा.यशवंत डाळ, रविंद्र बांदल, प्रकाश तनपुरे, गणेश खुटवड, गणेश निगडे, स्वप्निल कोंडे,विद्या यादव, कल्पना गोळे, राजेश खोपडे, मंदार वीर, मनोज खोपडे, मनोज निगडे, सुरज कोंडे,अभिषेक खोपडे, अमोल लिमण, गिरीश निगडे, शुभांगी जायकर,नंदा पवार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top