भोर ! संतोष म्हस्के ! भोर वेल्हा तालुक्यांमध्ये महसूल विभागाचा मेगा कॅम्प : शेतकऱ्यांना मिळणार विविध महसूल योजनांचा फायदा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर व वेल्हा तालुका हा अतिशय दुर्गम-डोंगरी भागात विखुरलेला आहे. या तालुक्यात दि.१४ ते दि.२८ या कालावधीत दोन्ही तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय भोर व वेल्हा उपविभागीय अधिकारी कार्यालय भोर येथे विशेष शिबिर मोहिमेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अन्वये जमिनीचे एका प्रयोजनातून दुसऱ्या प्रयोजनात रूपांतर करण्याची कार्यपद्धती विशद केली आहे .            
          महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा १९६६ चे कलम ४३ ड अन्वये सध्या गावच्या प्रचलित गावठाणाच्या हद्दीपासून बाहेर २०० मीटरच्या आत ज्या शेतकरी खातेदारांची जमीन स्थित आहे अशा शेतकरी खातेदारांना व नागरिकांना भोर,वेल्हा तहसील कार्यालयामार्फत स्वतःहून रूपांतर कर व जमिनीची आकारणी बाबत नोटीस पाठवण्यात येत असून सदर पात्र खातेदारांनी सदर नोटीसीच्या अनुषंगाने कराचा भरणा केले नंतर सदर जमीन मालकांना याबाबत मानीव अकृषक सनद आदेश तात्काळ दिला जाईल.याबाबत भोगवटाधारक वर्ग दोन असेल याबाबतीत सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रचलित कायद्याखाली आवश्यक नजरांना भरून पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे .देवस्थान व महार वतन जमिनींचा समावेश करण्यात आला नाही. तसेच या मोहिमेत  शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्या बाबत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणी व लागवडीखाली योग्य नसलेले क्षेत्र पोट खराब असलेले क्षेत्र हे पुन्हा लागवडीखाली आणण्यासंबंधीचे पोट खराब कमी करण्यासंबंधीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दोन्ही तालुक्यातील शेतकरी खातेदार यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे ,भोरचे तहसीलदार सचिन पाटील व वेल्हा तालुक्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केली आहे.
                                          
To Top