मेढा ! डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी न्युज 18 लोकमतचे सचिन जाधव यांची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : ओंकार साखर
महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी न्युज 18 लोकमतचे सातारा प्रतिनिधी सचिन जाधव  यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी सातारा समाचार चे संपादक संजय कदम यांची तर उपाध्यक्ष पदी संतोष शिराळे,प्रमोद तोडकर यांची   निवड करण्यात आली. 
         सातारा येथील डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्यालयात आज सोमवारी नवीन कार्यकारणीची घोषणा महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विकास भोसले यांनी घोषित केल्या.
            यावेळी सातारा जिल्हा कार्यकारणी मध्ये सोमनाथ साखरे यांची जिल्हा सचिव गणेश बोतालजी यांची खजिनदार तर धनंजय पानसांडे यांची सहसचिव राहुल ताटे- पाटील यांची  जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली.या निवडी नंतर नूतन जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भविष्यातील वाटचाली गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत या संघटनेच्या प्रत्येक सभासदाला लवकरच आकर्षक ओळखपत्र तसेच 3 लाखाच विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
          यावेळी महाराष्ट्र लाईव्ह चॅनल चे संपादक विकास भोसले,राहुल ताटे,संजय कदम उपस्थित होते.
To Top