सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राष्ट्रीय इन्स्पायर्ड ॲवार्ड मानक स्पर्धा २०२१-२२ साठी सोमेश्वर विद्यालय भाग शाळा, करंजेचा विद्यार्थी हर्षद शिवाजी गायकवाड याच्या प्रयोगाची निवड झाली आहे. पुणे जिल्ह्यास्तरावरील प्रयोगांमध्ये हर्षद याच्या 'स्वयंचलित सॅनिटायझर मशीन' या प्रयोगाचा समावेश झाला आहे.
शाळा, दवाखाने, बस, सार्वजनिक ठिकाणे, अभ्यासिका इ. ठिकाणी हे मशीन उपयुक्त ठरणार आहे.
या प्रयोगासाठी हर्षदला आदित्य माने व आर्यन काळुखे या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. तसेच विज्ञान विषय शिक्षक ए.सी.डोंबाळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
हर्षदच्या यशाबद्दल सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच विद्यालयाचे प्राचार्य बी.एस.मिंड, उपप्राचार्य ए.एस.भोसले व पर्यवेक्षक एन.ए.निगडे यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.