मेढा ! ओंकार साखरे ! सह्याद्रीच्या खोऱ्यात 'प्रतापगडा'च्या पायथ्याशी 'दरे' प्राथमिक शाळेतील 'मावळ्यां'चा रंगला अनोखा खेळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : ओंकार साखरे
दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले प्रतापगड येथे अनेक कार्यक्रम पार पडले त्यात , प्रतापगड च्या पायथ्याशी असलेले दरे गाव हे अतिशय लहान गाव असून त्या गावातील असलेली जि.प.प्राथमिक शाळा ही इयत्ता १ ते ४ शाळा वेळोवेळी नवनवीन खेळाचे उपक्रम राबवत असते त्यातील हा एक काठ्यांवरची कसरत या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवप्रताप दिनी काठ्यांवरती कसरत करत एक अनोखा उपक्रम केला आहे या शाळेचा सगळीकडे नावलौकिक होत आहे . या शाळेचे मुख्यद्यापक राजेंद्र गोफणे तसेच अर्चना तळेकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे त्यामध्ये पालक रामचंद्र गायकवाड,नितीन गायकवाड,विशाल गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे 
                   शाळेचे विद्यार्थी काठ्यांवरती कसरत करत शाळा दरे येथून किल्ले प्रतापगड येथे पोहोचले. सोबत शाळेचे मुख्यद्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
To Top