बारामती ग्रामपंचायत रणसंग्राम ! 'निंबुत'च्या लेकीचा 'वाणेवाडी'च्या सरपंचपदासाठी अर्ज दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 बारामती तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत वाणेवाडीचे मा. सरपंच दिग्विजय जगताप यांच्या पत्नी व निंबुत येथील सूर्यकांत काकडे यांच्या कन्या गितांजली जगताप यांनी सरपंचपदासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 
           राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ कार्यक्रम जाहीर केला असून १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बारामती तालुक्यातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी व गरदडवाडी ग्रामपंचायत निवडणूक ही लक्षवेधी होणार असून सोरटेवाडी बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. सरपंचपद जनतेतून असल्याने अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सरपंचपद खेचून आणण्यासाठी कंबर कसली आहे. सरपंचपद जनतेतून असल्याने अनेकांना सरपंचपदाचे स्वप्न पडले आहे.
To Top