बारामती ! पुणे जिल्हा बँकेच्या मुरूम शाखेत बोगस पासबुक काढून दिले : वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार : पी के जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुरुम शाखेत बोगस खाते  काढून पासबुक दिले असल्याची तक्रार सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक पी. के. जगताप यांनी केली आहे. 
         संबंधित व्यक्ती पुणे येथे राहत असल्याचे जगताप यांनी सांगितले. सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी उमेदवारांना बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती हजर नसताना बॅंकेतील अधिकाऱ्यांनी बोगस पासबुक आणि खाते काढण्यात आले असल्याचे जगताप यांनी सांगितले. बॅंकेतील अधिकाऱ्यांनी  कागदपत्रे व संबंधित व्यक्तींची माहिती घेऊनच खाते काढणे गरजेचे असताना बॅंकेचे अधिकारी चुकीचे काम करत आहेत. याबाबत बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
To Top