सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
काटेवाडी : गजानन हगवणे
घर हे मंदिर आहे. घरातील आई-वडील देव-देवता आहेत.आई वडिलाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे मत रामायणचार्य रामराव ढोक महाराज यांनी केला.
ते ढेकळवाडी (ता बारामती ) येथे जनार्दन बोरकर यांच्या स्मृती दिना निमित्त आयोजित किर्तन निरूपन क्रार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले की घरातील वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. घरातील आई वडिलांना मुलांप्रमाणे सांभाळा. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, म्हणून तर तुम्ही या ठिकाणी आहात. महामारीत वाचले म्हणून तुमचा पुनर्जन्म म्हणावा लागेल, मदतीपेक्षा आधार द्या, हसत समाधानाने जगा, तरुण वर्गाने कष्टाने कामवा, पर्यावरणाचा समतोल राखा, मन खंबीर ठेवा, आजार होणार नाही. असा संदेश ढोक यांनी दिला. आयुष्यात आईपेक्षा वडिलाचे कांकणभर का होईना ऐवढे प्रेम आपल्या मुलावरती जास्त असते हे सुद्धा हे सुद्धा त्यांनी आवृर्जन सांगितले .यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार डॉ तुषार बोरकर यांनी स्वागत केले, शरयू फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांचा ढोक महाराज यांच्या हस्ते सत्कार केला . पवार यांनी बोरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले . दादासाहेब बोरकर व सुरेश बोरकर या बंधुच्या हस्ते महाआरती करण्यात आली तदनंतर बोरकर कुंटूबियाच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला यावेळी ढेकळवाडी, तावशी, काटेवाडी, खताळपटटा,उद्धट, सपकळवाडी, बोरी, भवानीनगर, डोर्लेवाडी, सणसर, बारामती परिसरातील भजनी मंडळ व ग्रामस्थ, नातेवाईक मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते