राजगुरूनगर ! टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारहकांनी केला एकाच दिवसात पहिणे नवरा नवरी सुळका सर : डॉ.समीर भिसे आणि टीमची मोहीम फत्ते

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
राजगुरूनगर : प्रतिनिधी
श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४७ व्या जयंतीचे औचित्य साधत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सह्याद्री पर्वतरांगेत अरोहणासाठी कठीण श्रेणीत गणले जाणारे पहिणे नवरा नवरी सुळका सर केला. महाराजा यशवंतराव होळकर यांना भगवा स्वराज्यध्वज हाती घेत शिखरावर वंदन करण्यात आले.
        या मोहिमेची सुरुवात महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या वाफगाव (ता. खेड) येथील होळकर वाड्यास होळकर वंशज असलेले योगेशराजे होळकर यांच्या उपस्थितीत नतमस्तक होऊन झाली.
या मोहिमेची सुरुवात लक्ष्मणपाडा, पहिणे गाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथून झाली. एकाच दिवशी २४० फुटी पहिणे नवरा सुळका आणि २६० फुटी पहिणे नवरी सुळका गिर्यारोहकांनी सर केला. एकाच दिवशी पहिणे नवरा नवरी सुळका सर करणाऱ्या काही मोजक्याच गिर्यारोहकांपैकी टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सचेही नाव कोरले गेले.
         शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि काळजाचे ठोके चुकवणारा सुळक्याचा अंगावर येणारा खडतर मार्ग, चिमणी क्लाइंब ची अनुभूती देणारा थरार, खडकांच्या खाचांमध्ये हाताच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करणे, एक चुकीचे पाऊल आणि खोल दरीतच विश्रांती असल्याने चुकीला माफी नाही असे हे ठिकाण अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंखे, विशाल बोडके, राजश्री चौधरी, ज्योती राक्षे आवारी, रोहित धुर्जड, भारत वडमारे, संकेत जाधव आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.
To Top