सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
छ. खासदार उदयनराजे भोसले आज येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज शिवतिर्थास भेट देवून शिवप्रतिमेस पुप्षहार अर्पण करुन पुढे रायगडला रवाणा झाले. यावेळी महाराज प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज दुपारी ४ वाजता त्यांनी येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक वाहणांचा ताफा होता. हलगी, तुतार्यांच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तर शिवप्रतीष्ठान हिंदुस्तानच्यावतीने शिवस्तुती करण्यात आली. वाईतील महाराज प्रेमिंच्यावतीने त्यांचे पुष्पगुछ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी विजयसिंह नायकवडी, दिपक ननावरे, विक्रम वाघ, प्रमोद अनपट, निखिल सोनावणे, वहिवाटदार चंद्रकांत भोसले, संदिप साळूंखे, कौशिक गोळे, रमेश पवार, राहुल जमदाडे, आदित्य चौधरी, अल्पेश कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.