सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभरात वारंवार क्रीडा स्पर्धा भरविल्या जातात.या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सुदृढ आरोग्यासाठी खेळांना प्राधान्य द्यावे तसेच खेळांच्या माध्यमातून भविष्य घडवून शाळेचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन भोर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष समीर सागळे यांनी केले.
भोर येथील भोर एज्युकेशन सोसायटीचे राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन रविवार दि.२५ करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष सागळे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संतोष म्हस्के,प्रमुख पाहुणे उद्योजक राहुल पवार, राजेंद्र आवाळे, नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर, डॉ.अण्णासाहेब बिराजदार,प्राचार्य डी.ए. शिवतरे,मूकबधिर विद्यालय मुख्याध्यापक शरद जाधव ,व्ही.आर. अवघडे,उपमुख्याध्यापक संजय कडू, विश्वास निकम, विनोद वाघ, प्रा.विक्रम शिंदे,प्रा.दत्तात्रय शिंदे,संजय खुटवड, प्रा.सोमनाथ सोडमिसे ,सोमनाथ कुंभार,रोहित वरटे आदींसह शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर माजी विद्यार्थी उद्योजक राजेंद्र आवाळे व राहुल पवार यांनी विद्यार्थी -विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
COMMENTS