बारामती ! मी म्हणजेच पावती...! पंचायत समितीमधील निवडणूक अधिकाऱ्याचा प्रताप : उमेदवारी अर्जासाठी ५०० ऐवजी घेतले ५००० हजार : शिकलेल्या उमेदवारांच फसवलं जातंय...! तर पंचायत समितीमध्ये येणाऱ्या गोरगरिबांच काय ?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
वाघळवाडी(ता. बारामती) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अनामत रक्कम म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १३ उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते. शिकलेल्या उमेदवारांची जर हा अधिकारी फसवणूक करत असेल तर पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या गोरगरीब जनतेची ही अधिकारी किती फसवणूक करत असतील हा मुद्दा आता चव्हाट्यावर येत आहे.          
                वास्तविक सरपंच व सदस्य पदासाठी ५०० रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र वाघळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवारांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये घेतले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने मंगळवारी (दि.६) रोजी वाघळवाडी गावात जात ५ हजार रकमेपैकी साडेचार हजार रुपये रोख स्वरूपात परत केले आहेत. ५ हजार रकमेची पावती मात्र उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. मात्र काही उमेदवारांना पावती दिली नाही...मी म्हणजेच पावती..असे त्या संबंधीत अधिकाऱ्याने उत्तर दिले. उमेदवारांनी मात्र याबाबत तहसीलदार अथवा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली नाही. ५०० रुपये अनामत रक्कम असताना ५ हजार रुपये का स्वीकारले हा प्रश्न मात्र यामुळे उपस्थित झाला असून वरिष्ठ अधिकारी नेहमीप्रमाणेच अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
         बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची निवडणुक सध्या सुरू असून बुधवारी चिन्ह वाटप होऊन १८ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनामत रक्कमेबाबत माहिती नसणे ही गंभीर बाब असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. वास्तविक एकाददुसऱ्या उमेदवारांकडून जास्तीचे पैसे घेतल्यानंतर चूक लक्षात येणे गरजेचे होते. मात्र चूक सुधारण्याऐवजी पुन्हा करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली. 
To Top