सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात येवू घातलेल्या ५४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमात गावबैठका होऊन समझोता करीत २४ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून ३० ग्रामपंचायतचे मतदान होणार आहे. तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.त्यातील आपटी, बसरापूर ,सांगवी वेखो साळुंगण ,कुंबळे, मळे, वीरवाडी ,सोनवडी ,मसर खुर्द, गुढे,रावडी, भावेखल, हातनोशी, कोंडगाव, भूतोंडे , वाढाणे, खडकी ,दुर्गाडी, कोरले ,पांगारी नानावळे ,वेळवंड, गृहिणी, करंदी खुर्द ,कोळवडी, करंजगाव या २४ ग्रामपंचायती बिविरोध झाल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. निवडणूक कार्यक्रम लागलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक ही १८ डिसेंबरला होणार आहे.तर कांबरे खेबा ग्रामपंचायत साठी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून दोन वार्डांमध्ये निवडणूक लागली आहे.