बारामती ग्रामपंचायत रणसंग्राम ! १३ गावातील सरपंचपदासाठी ३६ तर १३७ सदस्यपदासाठी २९१ उमेदवार निवडणूक रिंगणात : सहा गावातील १० उमेदवार बिनविरोध : गावनिहाय आकडेवारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून आज 
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदाचे ६९ तर सदस्यपदाचे २८३ उमेदवारांनी आपले  उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. 
१३ गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ३६ तर सदस्यपदासाठी २९१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. सहा ग्रामपंचायत मधील दहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 
        अर्ज छाणणीच्या दिवशी अनेक उमेदवारांच्या पदरी निराशा आली आहे. ७०६ उमेदवारी अर्जापैकी १४ जणांचे उमेदवारी अर्ज अवैद्य झाले होते. यामध्ये सरपंचपदाचे ३ तर सदस्यपदाचे ११ उमेदवारी अर्ज अवैद्य ठरले होते. 
         तालुक्यातील मोरगाव कऱ्हाटी, लोणीभापकर,    मासाळवाडी, पळशी, पणदरे, कुरणेवाडी, वाघळवाडी,  मुरूम                 
वाणेवाडी, गडदरवाडी, सोरटेवाडी           
सोनकसवाडी या १३ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीत सरपंचपदासाठी १०८ तर सदस्यपदासाठी ५९८ असे ७०६  उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 
आज दुपारी तीन वाजता अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. त्यानंतर उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले.उद्यापासून प्रत्येक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे. दि १६ रोजी प्रचाराची सांगता होणार आहे. दि १८ रोजी मतदान असून २० रोजी निकाल आहे. 
 ---------------------------
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतसाठी गावनिहाय निवडणूक रिंगणात उभे राहिलेल्या  उमेदवारांची आकडेवारी - सोमेश्वर रिपोर्टर
                   सोमेश्वर रिपोर्टर
To Top