सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
मेढा - घरात मुले जेवत असताना गावातील संतोष शेलार , प्रशांत सुदाम शेलार, अन्वय संतोष शेलार, सुरज विष्णु भिलारे आणि सोमनाथ जगन्नाथ भिलारे सर्व रा सोमर्डी ता जावली यांनी मारहाण, धमकी, शिवीगाळ आणि विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार नुसार घरामध्ये मुले जेवन करीत असताना सोमर्डी गावातील संतोष शेलार हा शिवीगाळ करीत घराचे दिशेने आला . तसेच प्रशांत सुदाम शेलार, अन्वय संतोष शेलार, सुरज विष्णु भिलारे, सोमनाथ जगन्नाथ भिलारे हे सर्वजन आमचे घराचे दिशेने आले . त्याच वेळी संतोष कोंडीबा शेलार यांनी घराचा दरवाजा उघडला त्या वेळी मी घराचे दरवाजाजवळ उभी होती . संतोष कोंडीबा शेलार याने मला ..... जोराचा धक्का दिला . दिलेल्या धक्क्यामुळे मी घरातील फरशीवर पडले असल्याचे तक्रारीत त्या महिलेने दिले आहे.
पुढे तक्रारीत संतोष कोंडीबा शेलार, प्रशांत सुदाम शेलार, अन्वय संतोष शेलार, सुरज विष्णु भिलारे, सोमनाथ जगन्नाथ भिलारे हे सर्वजन मुले जवेत होती त्या ठिकाणी जाऊन हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली . त्याच वेळी संतोष शेलार मुलाला म्हणाला की, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली . त्यावेळी घाबरल्या मुळे मी व मुलगा घराचे बाहेर आले . त्या वेळी घराचे बाहेर येत असलेले संतोष कोंडीबा शेलार व प्रशांत सुदाम शेलार हे दारु पिलेले होते असेही तक्रारी मध्ये म्हटले आहे.
संबंधीत महिलेच्या तक्रारी वरून संबंधीत संशयीत आरोपींवर भादविस कलम 354,452, 323, 504, 506,510, 143,145, 146, 147, 149. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पो. हवा. शिंदे अधिक तपास करीत आहेत.