सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचयतींपैकी ४ बिनविरोध होवुन ११ ग्रामपंचयतींसाठी आज मतदान होत असून सरपंच पदासाठी २५ उमेदवार तर सदस्य पदासाठी ९० उमेदवार निवडणूकीत आपले भविष्य अजमाणार आहेत. ११ ग्रामपंचायतींपैकी कुसुंबी, करहर, मोरघर व ओझरे ग्रामपंतीमध्ये काटे की टक्कर पहावयास मिळणार आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणूकांमध्ये कोणतेही पॅनल राजकीय पक्षाचा वापर करीत नसले तरी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा स्वरुपात निवडणूक होणार आहे. सध्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व तालुक्यावर असल्याने त्यांच्या विचाराच्या ग्रामपंचायती असतील असे चित्र दिसत असले तरी त्या सहजा सहजी हाती येणार नाहीत. कारण राष्ट्रवादी कडून कडवे आव्हान उभे करण्यात येत आहे.
केळघर त. मेढा, रिटकवली, रामवाडी, वाकी या चार ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. मोरघर , सोमर्डी, ओझरे, करहर आणि कुसुंबी येथे समोरासमोर लढती होणार आहे. सरपंच पदासाठी २५ उमेदवार तर सदस्य पदांसाठी ९० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
निवडूकीच्या रिंगणात असलेले सरपंच ( सदस्य ) गावनियहाय संख्या पुढील प्रमाणे मोरघर 2 ( १२), सोमर्डी-२( १ ४ ), आखाडे २ ( ८), ओझरे 2( १२), रूईघर २( ४ ), शिंदेवाडी २ ( २ ), वालुथ ३( ६ ), करहर २ ( १ ४ ), भोगवली तर्फ कुडाळ ४ ( ४ ) , कुसुंबी २ ( १२ ), घोटेघर २ ( २ ), असे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.