सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात हॉटसीटवर बसलेल्या व्यक्तीला अमिताभ बच्चन जेव्हा प्रश्न विचारतात.....भारत के लिए १९४६ और १९५२ के बीच सात टेस्ट मैच खेलने वाले सदाशिव शिंदे महाराष्ट्र के किस पूर्व मुख्यमंत्री के ससुर थे....हा प्रश्न हॉटसीटवर बसणाऱ्यासाठी पैसे कामावण्यापुरता असला तरी बारामतीकरांसाठी अभिमानाचा होता... त्या निमित्ताने बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथील सदाशिव शिंदे यांच्या स्मृतींनी पुन्हा एकदा उजाळा मिळाला होता.
सोनी टीव्हीवरील अमिताभ बच्चन अँकर करत असलेले कौन बानेगा करोडपती हा कार्यक्रम हा काही प्रेक्षकांना नवखा नाही. अनेक भाग पार पडलेल्या या कार्यक्रमात करोडो रुपये बक्षिसाच्या स्वरूपात दिले जातात. नुकत्याच पार केबीसी कार्यक्रमात अमिताभ बच्चन हे बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथील क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांनी भारतासाठी १९४६ ते १९५२ दरम्यान सात सामने खेळले होते. याच्याशी संबंधित प्रश्न विचारतात की, सदाशिव शिंदे हे महाराष्ट्राचे कोणते मा. मुख्यमंत्री यांचे सासरे होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सासरवाडी ही बारामती तालुक्यातील चौधरवाडी असून सदाशिव शिंदे हे खा.शरद पवार यांचे सासरे आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे यांचे ते आजोबा आहेत. हा प्रश्न बारामतीकरांसाठी अभिमानास्पद असला तरी सदाशिव शिंदे यांच्या स्मृतींना उजाला मिळाला आहे.