सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
मागील दोन वर्षांपासून भोर ते श्री क्षेत्र नारायणपूर बंद असलेली एसटी बस सेवा आम्ही भोरकर प्रतिष्ठानच्या मागणीनुसार गुरुवार दि.१ डिसेंबर सुरू करण्यात आली.या बस सेवेमुळे भोर तालुक्यातील नागरिकांना पवित्र व सुप्रसिद्ध श्री एकमुखी दत्त महाराजांच्या मंदिरात नारायणपूर येथे ये - जा करता येणार आहे. कोरोना काळात गेली दोन वर्षे ही सेवा बंद करण्यात झाली होती.ती एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी आम्ही भोरकर प्रतिष्ठानने भाविकांच्या वतीने करण्यात आली होती.यावेळी आगार प्रमुख युवराज कदम यांनी मोलाचे सहकार्य करत भाविकांची मागणी विचारात घेऊन एसटी बस सुरू केली.तालुक्यातील भाविक भक्त व प्रवासी,जेष्ठ नागरिक व युवकांनी एसटीनेच सुरक्षित व उत्तम सेवेचा लाभ घेत प्रवास करावा असे आवाहन यावेळी भोर आगार प्रमुख यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी वाहक बाबुराव गाडे ,चालक बापू शेडगे , आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर ,सदस्य प्रसाद शिवभक्त,राहुल दिघे , मंगेश गोळे , प्रमोद सुपेकर , अशोक गुप्ता एस टी कर्मचारी धनंजय बांदल , अनंत मदेवार , तानाजी म्हस्के ,सोनबा शिंदे,जगन्नाथ भेलके , हेमंत देवघरे , प्रवासी बबनराव बांदल , संजय पाटील , संतोष गुंड , आदिंसह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते .