सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील बाजारवाडी (मानकरीवाडी)ता. भोर येथील बळीराजा शेतकरी गटास गोदरेज कंपनी विंग आणि ॲवॉर्ड संस्था सातारा यांच्याकडून कृषी अवजारे बॅकेचे वाटप करण्यात आले. या कृषी अवजारांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठा फायदा होणार आहे. बळीराजा शेतकरी गटासाठी पेरणी यंत्र, पावर टेलर, भात कापणी रिफर, नांगर, रोटर व रेझर अशी अवजारे मिळाली असून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर शेती कामांना वापरण्यासाठी अवजारे देण्यात येणार असल्याचे सचिव प्रफुल्ल हवालदार यांनी सांगितले.यावेळी गोदरेज कंपनीचे प्लान्ट हेड सुनिल बेलुशे, प्रोडक्शन मॅनेजर संजय निगडे ,ॲवॉर्ड संस्था साताराचे किरण कदम, कु सुरज पवार व प्राजक्ता गायकवाड ,बळीराजा शेतकरी गटाचे अध्यक्ष दत्तात्रय चोरगे ,उपाध्यक्ष राजाराम चव्हाण, सरपंच सीताबाई गुरव, उपसरपंच मोहन मानकर,सदस्य उत्तम खोपडे,रूपाली जाधव,तुषार शिंदे उपस्थित होते.