सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : सुनील जाधव
बारामती तालुक्यातील निरा - बारामती पणदारे खिंड म्हणून ओळखले जाणाऱ्या पणदारे गावालगत डोंगरावरती धुराचे लोट दिसतात तरुणांची हुशारी व हिम्मत धखावली. आणि डोंगरावर लागलेली आग काही क्षणात विझवली.
माळेगाव येथील आयटीआय कॉलेज वरून घरी जाताना दुपारच्या वेळेस आग, धुराचे लोट दिसतात थांबून आग विझवण्याचे प्रयत्न केले. हे पाहून अनेक जण त्याच्या मदतीला आले आणि शेवटी आग विझवली. झाडाची पाने -डहाळे घेऊन वडगाव निंबाळकर येथील ज्ञानेश्वर खोमणे, ओंकार जगताप, सागर खोमणे या तीन तरुणांनी व लोकांनी दोन तास प्रयत्न करून आग विजवली. याच्या या हिम्मतिमुळे सर्व डोगर जाळन्यापासून वाचला .यामुळे सर्वांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले.