सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहराबाहेरून होणाऱ्या महत्वाच्या वाहतुकीच्या मार्गावरील चौपाटी-रामबाग मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरच्या पुलाला भले मोठे भगदाड पडले असून या भगदाडामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा भरावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
चौपाटी- रामबाग मार्गावरून शिरवळ ,पुणे तसेच महाडकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते.या मार्गावरील अरुंद पुलाला खड्डा पडल्याने रात्री अपरात्री दुचाकी तसेच चार-चाकी वाहन चालकांना पुलावरील खड्डा दिसला नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. दिवसा वाहन चालकांना खड्डा दिसत असल्याने भीतीने वाहने सावकाश चालवली जात होती मात्र संध्याकाळच्या वेळी हा खड्डा दिसत नसल्याने होऊ शकतो असे वाहन चालकांकडून सांगण्यात आले.