सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
पवित्रस्थान असलेल्या सम्मेध शिखर्जी जिल्हा गिरडोह राज्य झारखंड या स्थानाचा केंद्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ निराशहरातील सकल जैन धर्मीय बांधवांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला .
याप्रसंगी निरा शहराचे सरपंच तेजस्वी काकडे ,उपसरपंच राजेश काकडे ,दिपक काकडे , जिल्हा परिषद बांधकाम आरोग्याचे माजी सभापती दत्ताजी चव्हाण ,सुधीर शहा , मनोज शहा , डॉक्टर निरंजन शहा तसेच निरा शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष तनुजा शहा यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला .यावेळी मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते. व्यापार पेठ बंद ठेवून निराशहरवासी यांनी पाठिंबा दर्शवला.