भोर ! हिर्डोशीत धरणग्रस्त आंदोलकांनी तोंडाला काळे फासत केला प्रशासनाचा निषेध

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडोस मावळ खोऱ्यातील नीरा- देवघर धरण श्रेत्रातील हिर्डोशी येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन प्रश्न गेल्या १७ वर्षांपासून वंचित आहेत.याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने मागील ५ दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनात आंदोलकांनी तोंडाला काळे फासून प्रशासनाचा बुधवार दि.२१ निषेध केला.
              १७ वर्षांपासून प्रशासनातील वेगवेगळ्या स्तरावर तहसीलदार, प्रात,अप्परजिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्रालय, माननीय मंत्री महोदय, मुख्य सचिव (पुनर्वसन) या सर्वांबरोबर वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये प्रशासनाने आपली चूक मंजूर केली असून या ३५ खातेदारांना जमीन वाटप होणे आवश्यक असल्याबाबत तोंडी सांगितले होते. तत्कालीन मंत्री महोदयांनी निर्देश देऊन सुद्धा प्रशासन हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. धरणग्रस्तांचा प्रदीर्घ संघर्ष व वाताहत पाहता पुनर्वसन यंत्रणेच्या चुकीची शिक्षा गेली १७ वर्ष धरणग्रस्त भोगत आहेत.प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे धरणग्रस्तांचे आयुष्य उध्वस्त झाले असून ही बाब प्रशासनाला लज्जास्पद व धरणग्रस्तांमध्ये चिड निर्माण करणारी आहे.त्यामुळे हिर्डोशी धरणग्रस्तांनी पुणे विभागीय आयुक्त यांना पत्राद्वारे प्रशासनाला स्पष्ट संकेत देत आंदोलन करण्यास शनिवार दि.१७ पासुन सुरवात केली होती.धरणे आंदोलनाला ५ दिवस होत आले तरी शासन -प्रशासन दखल घेत नसल्याने बुधवार दि.२१ आंदोलकांनी तोंडाला काळे फासून प्रशासनाचा निषेध केला.तर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नीरा -देवघर धरणात जलसमाधी घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आसल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.
To Top