सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सममेद शिखरजी यास पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ भोर शहरातील श्री शांतिनाथ जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ भोर(सकल जैन समाज) यांच्या वतीने बुधवार दि.२१ भोर बंदची हाक देत निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार आजिनाथ गाजरे यांना निषधाचे निवेदन देण्यात आले.
निर्णयाच्या निषेधार्थ भोर येथील जैन बांधवांनी निषेध मोर्चा शहरातील जैन मंदिर ते भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय राजवाडा पर्यंत काढला.यावेळी शेकडो जैन बांधव भगिनी उपस्थित होते.