सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील दंडवाडी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ३६ बाटल्या रक्त संकलन झाले. यावेळी रक्तदानात सहभागी झालेल्या युवकांना टि शर्टचे वाटप करण्यात आले.
दंडवाडी येथे माजी केंद्रीय कृषी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जि. प. सदस्य भरत खैरे, उद्योजक शंकरराव चांदगुडे, व्यापार व उद्योग विभागचे तालुकाध्यक्ष सुभाष चांदगुडे, माजी सभापती संपतराव जगताप, माजी संचालक गणेश चांदगुडे, माजी जि. प. सदस्य बापूराव चांदगुडे, सरपंच मनीषा चांदगुडे, उपसरपंच अतुल हांडे, सदस्य शांताराम चांदगुडे, हनुमंत चांदगुडे, विजय चांदगुडे, महेश चांदगुडे आदींसह ग्रामस्थ व तरूण वर्ग उपस्थित होते.
रक्तदान करणाऱ्यास प्रशस्तीपत्रक व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक भेट देण्यात आले. तसेच टि-शर्टचे वाटप करण्यात आले. येथील विजय चांदगुडे, हनुमंत चांदगुडे, तुषार चांदगुडे यांच्यावतीने कार्यक्रम यशस्वी करण्याकामी सहकार्य झाले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेश चांदगुडे यांनी केले. तर तुषार चांदगुडे यांनी आभार मानले.
......................................