जावली ! ओंकार साखरे ! जावलीत शिवेंद्रराजे गटाचे वर्चस्व तर मोरघर शशिकांत शिंदेंच्या ताब्यात

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
जावळीत आ. श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे वर्चस्व कायम राहीले असून तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतीवर आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे तर मोरघर ग्रामपंचायत आ. शशिकांत शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. 
           जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीं पैकी  रामवाडी, केळघर, रिटकवली, वाकी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. प्रत्यक्षात ११ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणूकीत रुईघर, वालुथ, करहर, ओझरे, घोटेघर, भोगवली तर्फ कुडाळ, शिंदेवाडी, आखाडे, कुसूंबी, सोमर्डी या ग्रामपंचायतींवरही आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने विजय मिळवून बिनविरोध चार ग्रामपंचायती सह १४ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.
             तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाने  सोमर्डी येथे ललिता शांताराम जगताप, वालुथ येथे मनिषा कमलाकर भोसले, शिंदेवाडी येथे धनंजय धोंडीराम शिंदे,ओझरे येथे अजित निवृत्ती मर्ढेकर,आखाडे येथे सखाराम रघुनाथ गायकवाड, करहर येथे सोनाली नरेंद्र यादव, मोरघर येथे शिवाजी गोविंद डोईफोडे ,रुईघर येथे अंजना अंकुश बेलोशे, घोटेघर येथे उज्वला संदिप रांजणे, भोगवली तर्फ कुडाळ येथे समीर तुकाराम गोळे तर कुसुंबी येथे सरपंच पदासाठी मारुती चिकणे व साधु चिकणे या दोघानांही समान मतदान ६४८ झाल्याने चिठ्ठी टाकून मारूती चिकणे विजयी झाले आहेत.
           सकाळी मत मोजणीस तहसिल कार्यालयात सुरवात करण्यात आली.  मत मोजणी साठी ८ टेबल , ८ - RO , १६ - AR0 आणि ८ शिपाई व कोतवाल यांनी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कार्यरत होते .
             निवडणूक निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन संगीता राजापूर चौगुले, जावळीचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजेंद्र पोळ यांचे मार्गदर्शना खाली निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
To Top