भोर ! बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात निषेध मोर्चा : कडकडीत बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
     महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज तसेच फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांबाबत अपमानास्पद ,अनादरयुक्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे नेते तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात भोर शहरात कडकडीत बंद पाळीत शेकडोच्या संख्येने सामील होत विविध संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला.
    छत्रपती शिवाजी महाराज गौरव समिती,सकल मराठा समाज भोर यांनी चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातून तहसील कार्यालय भोर पर्यंत निषेध मोर्चा काढला.यावेळी व्यापारी वर्ग बंदला प्रतिसाद देत बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत मोर्चात मोठ्या संख्येने सामील झाले होते तर शहरातील मुस्लिम संघटनेने निषेध मोर्चात सामील होत पाठिंबा दिला.
         निषेधाचे निवेदन तहसील कार्यालयासमोर प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी विविध संघटनांचे शेकडोहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. 
To Top