सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील भोर - मांढरदेवी मार्गावरील आंबाडखिंड घाटात शनिवार दि.१७ कोळेवडी येथील शेतकरी गणपत आबाजी रांजणे खाजगी रानात गाया चारत असताना बिबट्याने अचानक केल्याने हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत शेतकऱ्याचे ५० हजाराहून अधिक नुकसान झाले आहे.
आंबाडखिंड घाटात( ता.भोर) कायमच वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते मात्र घाट परिसर जंगलमय असल्याने हिंस्र जंगली प्राण्यांना लपण्यासाठी जागा असते.याच परिसरात मागील एक वर्षांपूर्वी बिबट्याचे काही दिवस वास्तव्य होते.वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र बिबट्या सापडला गेला नाही .पुन्हा एकदा शनिवार दि.१७ बिबट्याने वीसगाव खोऱ्यातील आंबाडखिंड घाट परिसरातील कोळेवाडी येथील शेतकऱ्याच्या गाईचा फडशा पाडून नुकसान केले आहे. या घटनेची माहिती अंबाडे कोळेवाडी येथील पोलीस पाटील संदीप रांजण यांनी वन विभागाला त्वरित दिली असून वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटना कडून होत आहे.तर घटनास्थळी सुरेश रांजणे, रवींद्र केळगणे, प्रकाश कांबळे, अशोक रांजणे ,तात्काळ पोहोचून शेतकऱ्याला धीर दिला.