सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
वेल्हे तालुक्यात मतदान साहित्य वाटप केंद्रावर दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक बसून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ही दुर्दैवी घटना आज (दि. १७) वेल्हे तालुक्यातील धानेप गावच्या हद्दीत घडली आहे. सागर नामदेव देशमुख (वय. ३३ वारंगुसी, ता. अकोले, जि. नगर) असे असून ते वेल्हे तालुक्यातील कंधारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत होते.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देशमुख यांची मतदान अधिकारी क्र. ३ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षक देशमुख हे पानशेतकडून कादवे मार्गे दुचाकी क्रमांक एम एच १४ - सी बी ७३१४ ने वेल्हे याठिकाणी मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत असताना धाप गावच्या हद्दीत हा अपघात घडला. एम एच १२ एम व्ही ५१९० ह्या क्रमांकाच्या ट्रकची व दुचाकीची धडक झाली. दरम्यान त्यांना उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
COMMENTS