सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काटेवाडी : गजानन हगवणे
काटेवाडी (ता बारामती ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम राबविण्यात आला.
माजी केंद्रिय कृर्षी मंत्री व ज्येष्ट् नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पूणे शहर चे सरचिटणीस दिपक ज्ञानदेव लोढे यानी काटेवाडी येथे शालेय साहित्य चे वाटप उपक्रमाचे आयोजन केले होते . संरपच विद्याधर काटे उपसंरपच श्रीधर घुले, राष्ट्रवादी पुणेशहर चे सरचिटणीस दिपक लोढे, पप्पू राखपसरे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना संरपच काटे म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर चे सरचिटणीस दिपक लोढे साहेब यांनी शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप हा सुंदर उपक्रम राबविला आहे . लोढे यांचे अनुकरण इंतरानी ही करावे त्यामुळे विद्यार्थाना त्याचा उपयोग होईल . मूख्याध्यापिका राणी ढमे यांनी स्वागत केले .यावेळी संरपच विद्याधर काटे,उपसरपंच श्रीधर घुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय काळे, बाजार समितीचे माजी अध्यक्ष संजय काटे, सोसायटीचे माजी अध्यक्षअनिल काटे,गौरी कॉन्ट्रक्टर पुणे चे शिवाभाई गंगाधरे,पुणे शहर राष्ट्रवादी चे संघटन सचिव पप्पू शेठ राखपसरे,शितल काटे, तंटामुक्ती अध्यक्ष के.टी. जाधव, शारदा प्रतिष्ट्रान चे कूलदीप शेंडगे,गणेश देवकाते, जान्हवी कॅन्स्ट्रक्शन चे विशाल सुतार. सूम्मया मंडप चे निहाल शेख,कुलदीप जाधव, नंदकिशोर लोणकर, बाळासाहेब लोंढे,महादेव लोंढे ,महेश खवले,उमेश लोंढे, अमीर पठाण,बबन पाथरकर,संदीप झगडे,सागर पाटील उपस्थित होते .