सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर (करंजेपुल) येथील सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयामुळे कारखान्याच्या सभासदांसह सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे मत शिरूरचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर देवस्थान येथे आमदार पवार सपत्नीक दर्शनासाठी आले असता कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक मा.चेअरमन राजवर्धन शिंदे, करंजेपुलचे मा.सरपंच बाळासाहेब गायकवाड, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन.अनिल गायकवाड, एकता पथसंथेचे संस्थापक शिवाजीराव गायकवाड, करंजेपुलचे उपसरपंच निलेश गायकवाड,सागर गायकवाड, हरिष गायकवाड,विनोद गायकवाड, दशरथ गायकवाड, सचिन गायकवाड,मारुती गायकवाड, सुहास गायकवाड, सुमित भोसले, लक्ष्मण लकडे, रामराजे राजवडे, राजन सोरटे उपस्थित होते. आमदार पवार पुढे म्हणाले, आशा जनसंपर्क कार्यालायमुळे जनतेशी सहज संपर्क ठेवता येतो तसेच त्यांच्या समस्या आपण सहज पणे समजाऊन घेऊ शकतो. दरम्यान सोमेश्वरनगर येथील पत्रकार दत्ता माळशिकारे, ॲड गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, महेश जगताप, युवराज खोमणे यांच्याशी सहकारी साखर कारखानदारी संदर्भात अनेक वेळ चर्चा केली. वाकी येथील डॉ. रवींद्र सावंत यांच्या गाईंच्या गोठ्याला त्यांनी भेट देत दूध धंद्याची माहिती घेतली.