सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सद्या बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक धुमधडाक्यात सुरू आहे. दि २ रोजी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून सोमवारी अर्ज छाननी व बुधवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
गावातील इतर विकास करण्यासाठी शासन ग्रामपंचायतींना भरभरून निधी देत असते. यातून गावातील रस्ते, पाण्याच्या योजना, वीज, गटारे यांची कामे केली जातात. मात्र पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल, कामगारांचे पगार व इतर खर्च हे घरपट्टी व पाणीपट्टी यामधून करायचे असतात मात्र अनेक गावांतील ग्रामस्थ वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टी भरत नसल्याने ग्रामपंचायतींना महसूल मिळत नाही. पर्यायी कामगार पगार, वीजबिल व इतर खर्च करण्यास ग्रामपंचायतीवर निर्बंध येतात. पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल न भरल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनांची विजबिले तोडल्याची उदाहरणे काही नवीन नाहीत. बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायत पैकी बारामती तालुक्यातीच्या पश्चिम भागातही मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, सोरटेवाडी गडदरवाडी या ग्रामपंचायत च्या निवडणुका होत आहेत. सरपंचपद थेट जनतेतून असल्याने अनेकांनी आपलेलाच उमेदवारी मिळावी यासाठी कंबर कसली आहे.
मुरूम मधून सर्वात जादा ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल वाघळवाडी ७४, वाणेवाडी ५३, गडदरवाडी २७ तर सोरटेवाडी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी दाखल करताना ग्रामपंचायत थकबाकी नसलेला दाखल अनिवार्य असल्याने इच्छुकांनी सर्व थकबाकी भरून आहे. यामध्ये मुरूम ४ लाख, वाणेवाडी ४ लाख ५० हजार, वाघळवाडी ४ लाख, गडदरवाडी ५० हजार तर सोरटेवाडी ६५ हजार रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. मात्र निवडणूकी पुरता गावाचा कारभार चालण्यासाठी नियमित महसूल भरणे गरजेचे आहे.