अकलूज ! एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी विवाह करणं नवरदेवाला पडले महागात : अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
अकलूज : प्रतिनिधी 
एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट आलं आहे. भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात 
NCR दाखल झाला आहे. याप्रकरणी माळेवाडी येथील
राहुल फुले यांनी पोलिसात याबाबतची तक्रार दाखल केली
होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
         अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर दोनमध्ये राहणाऱ्या तरुणाने २ डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. या अनोख्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
To Top