Bhor Big Breaking ! संतोष म्हस्के ! वरंधा घाटात सेल्फी काढण्याच्या नादात तरुण ५०० फूट दरीत कोसळला : शोध मोहीम सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात वाघजाई मंदिरा शेजारील पॉईंट जवळ सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण दरीत ५०० फूट कोसळल्याची घटना मंगळवार दि.३ संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली असून या तरुणास शोधण्यासाठी महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीम तसेच आरोग्य विभाग सतर्क झाली असून या तरुणाचा शोध घेत आहेत.
    वरंधा घाट तालुका भोर हद्दीत एक अज्ञात तरुण सेल्फी काढण्यासाठी सज्ज होता.या वेळेसच अचानकपणे तोल जाऊन तो ५०० फूट दरीत कोसळला असल्याची प्राथमिक अंदाजानुसार माहिती मिळाली आहे. त्या तरुणाला शोधण्यासाठी महाड येथील रेस्क्यू टीम पोहचले असून त्याचा शोध घेत आहेत.मात्र तो अद्यापही सापडलेला नाही.तसेच महाड येथील काही तरुण घाटाच्या खालील बाजूने  माची पॉईंट वरून याचा शोध घेण्यासाठी चालत गेलेले आहेत.त्याबरोबरच भोर तालुक्यातील सह्याद्री रेस्क्यू टीम तसेच भोर प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून या दुर्दैवी घटना घडलेल्या तरुणासचा शोध घेण्याचे काम करीत आहेत.तो तरुण कोण आहे किंवा काय अवस्थेत आहे हे अजूनही प्रशासनाला तसेच साळुंखे रेस्क्यू टीम व भोर येथील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या तरुणांना समजलेले नाही.मात्र या अज्ञात तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.वरंधा घाटातील वाघजाई मंदिराशेजारी एक लाल कलरची फिगो चारचाकी गाडी एमच ०३ बी ई ७४१५ उभी असून या गाडीतील हा व्यक्ती असल्याचे प्रवासी तसेच वाहन चालकांकडून सांगण्यात आले आहे.
      वरंधा ता.भोर घाटातील झालेली घटना ही दुर्दैवी असून या तरुणाचा शोध घेण्यासाठी भोर तसेच महाड येथील रेस्क्यू टीम व नायब तहसीलदार मनोहर पाटील सर्कल पांडुरंग लहारे तसेच भोर पोलीस विकास लगस, उद्धव गायकवाड घटनास्थळी पोहोचलेले असून दरीत कोसळलेल्या तरुणाचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे असे भोर तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले
To Top