सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील आज पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडीत उपसरपंचपदाची माळ गणेश जाधव यांच्या गळ्यात पडली.
आज दुपारी २ वाजता सद्स्य मंडळाची मासिक सभा सरपंच adv. हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी अनिल शिंदे, गणेश शिंदे व निशिगंधा सावंत यांनी अर्ज दाखल केले.गुप्त पद्धतीने घेण्यात आलेला मतदानात गणेश जाधव यांना ७ अनिल शिंदे यांना ६ तर निशिगंधा सावंत o मते मिळाली.
निवडणूक निरीक्षण अधिकारी म्हणून के एच शेख, आणि ग्रामसेवक एन डी राठोड यांनी काम पाहिले.