भोर ! आंबाडे-खानापूर केंद्रात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ,अनंत अडचणींवर मात करीत मुलिंसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आंबाडे ,खानापूर ता.भोर केंद्रातील कायमच उपक्रमशील असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थिनीं व महिला शिक्षिका यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करीत साजरी करण्यात आली.
     लेख चैतन्याचे रूप ,लेक वासरूची धून, लेक अंगणी पैंजण, लेख अल्लड चांदणं, मुलगी म्हणजे मायेचा पाझर, मुलगी म्हणजे बापाचा आधार असे म्हणत अंबाडे केंद्रातील नेरे ,बालवडी,म्हस्केवस्ती, कोळेवाडी,वरवडी ,पाले गोकवडी, निळकंठ तर खानापूर केंद्रातील बाजारवाडी, धावडी ,हातनोशी, खानापूर , पळसोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी केली.यावेळी केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे,सुरेश कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेरे संतोष म्हस्के,विषयतज्ञ सुनील गोरड,संपत रांजणे,मोहिनी गायकवाड,बापू जेधे,मंगल,घोलप ,राजू कारभळ,खंडोबा घोलप,सुरेश खोपडे, छाया बढे,महादेव बदक,अनिल महांगरे,रवी थोपटे आदींसह ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
To Top