Bhor Big Breaking ! महिला बालकल्याणच्या पर्यवेक्षिकेला लाच घेताना रंगेहात पकडले : भोर शहरातील प्रकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
खात्याअंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयाच्या झालेल्या ऑडिटच्या अनुषंगाने ऑडिटर यांना  देण्यासाठी पर्यवेक्षिका विद्या गजानन सोनवणे यांनी ४ हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती. या अनुषंगाने तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेविका पर्यवेक्षिका विद्या सोनवणे यांनी ४ हजार रुपये लाचेची मागणी करून ती लाच रक्कम मंगळवार दि.१७ स्वीकारतना विद्या सोनवणे यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
             भोर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम गुन्हा नोंद झाला असून सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त अमोल तांबे ,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केली.पुढील तपास भोर पोलीस व युनिटचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.
      
To Top